E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
समृद्ध परंपरेचा वारसा
Wrutuja pandharpure
06 May 2025
हॉटेल मॅनेजमेंट विभाग,डॉ. महेश रंधवे, प्र. विभागप्रमुख
२००८ पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात माझा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मी केवळ एक शिक्षक म्हणून नाही, तर एक विद्यार्थी म्हणूनही खूप शिकलो. संशोधन करणे, विविध शैक्षणिक मान्यतांसाठी प्रस्ताव तयार करणे, ए.आय.सी.टी.ई (AICTE) व इतर नियामक संस्थांकडून मिळविण्याची प्रक्रिया समजून घेणे. अभ्यासक्रम रचना आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करणे हे अनुभव मला समृद्ध करणारे ठरले. या सर्व अनुभवांना दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे म्हणजेच विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक व कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांचे नेतृत्व. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आम्हा सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांना एका उच्च शिक्षणसंस्थेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. विशेष कौतुक करावे लागेल ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणति टिळक यांचे. या दोघांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि निःस्वार्थ पाठबळ आम्हाला सदैव उभारी देतात.२००७ मध्ये सुरू झालेला हॉटेल मॅनेजमेंट विभाग आज अत्याधुनिक प्रयोगशाळा, उत्तम उपकरणे आणि आधुनिक शिक्षण पद्धतीने सुसज्ज आहे. आमचे विद्यार्थी आज जगभरातील आघाडीच्या हॉटेल्स, रिसॉर्टस, क्रूझेस आणि पर्यटन कंपन्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. आमच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने आणि नेतृत्वाने विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यापीठाच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागाने चार तासांत १०२ भारतीय मिष्टान्न तयार करण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (लंडन) साठीची ऐतिहासिक कामगिरी हे आमचे अभिमानास्पद यश आहे. या वर्षापासून आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील पदव्युत्तर डिप्लोमा हा नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहोत. या क्षेत्रात कार्यरत पण औपचारिक शिक्षण न घेतलेल्या व्यक्तींना व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळावी, हा या मागचा हेतु आहे. आज आमचे औद्योगिक संबंध हे आमच्या अभ्यासक्रमांची ताकद बनले आहे. हॉटेल व पर्यटन क्षेत्रातील विविध कंपन्यांशी आमचे संपर्क विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील उत्तम अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरतात.ही प्रगतशील वाटचाल शक्य झाली ती प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांच्या नियोजनबद्ध प्रशासनामुळे. शैक्षणिक क्षेत्रातील सतत बदलणार्या गरजांशी सुसंगत राहण्यासाठी त्या आम्हाला सदैव सजग ठेवतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या १०४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा मी एक भाग आहे, याचा अभिमान वाटतो.
Related
Articles
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० जणांना गंडा
27 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता
30 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० जणांना गंडा
27 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता
30 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० जणांना गंडा
27 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता
30 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
ट्रम्प यांचे नाव वापरुन १५० जणांना गंडा
27 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता
30 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी